शासकीय नोकरी मिळवण्यासाठी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होण्याकरिता रात्रंदिवस अभ्यासाचा ध्यास घेऊन,कठोर तपस्या करून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असल्याचे मत प्रा.काशिनाथ आटपाडकर यांनी व्यक्त केले… कुरणेवाडी गावचे सुपुत्र किरण रामचंद्र गोडसे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षेतून गट ब सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता पदी निवड झाल्याबद्दल कुरणेवाडी ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.त्यानिमीत्त आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.यावेळी वजीर खाडे,दैवत काळेल, हरिश्चंद्र आटपाडकर,पितांबर आटपाडकर,बाबा आटपाडकर,रोशन आटपाडकर,अक्षय आटपाडकर,नाथा गळवे,किरण आटपाडकर, गणेश आटपाडकर, राहुल आटपाडकर, दिलीप आटपाडकर,नरेश आटपाडकर, दादासाहेब आटपाडकर, विलास आटपाडकर आदी मान्यवर उपस्थित होते…फोटो : किरण गोडसे यांचा सत्कार करताना प्रा.काशिनाथ आटपाडकरसह मान्यवर….
































