फलटण : पत्नीला वेडेवाकडे बोलल्याचा गैरसमजातून तरुणाने एकास पाईपने जबर मारहाण केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. 16 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शरद हणुमंत खोमणे (वय 38 वर्षे, रा.शेलार वस्ती, नवामळा, ठाकुरकी, ता. फलटण) हे ठाकुरकी, ता.फलटण येथील नवामळा शेलारवस्ती येथे खोमणे हा चुलत बहिणिचे मुलाचा वाढदिवस साजरा करण्यास गेले होते. त्या ठिकाणी खोमणे यांचा मित्र ओंकार दादा चोरमले याची पत्नी आली होती. तिला खोमणे यांनी ओंकार कुठे आहे येवढेच विचारले. त्यानंतर खोमणे त्यांच्या घराजवळील बुवासाहेब मंदिरात जावुन झोपले.
यानंतर रात्री 11:45 वाजण्याच्या सुमारास संशयित ओंकार दादा चोरमले (रा. ठाकुरकी नवामळा, शेलावस्ती, ता . फलटण) हा तेथे लोखंडी पाईप घेवुन येवून त्याचे पत्नीला वेडेवाकडे बोललो असा, त्याने गैरसमज करून घेवुन खोमणेना हातातील लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. या मारहाणीत खोमणेच्या दोन्ही पायावर, नडगीवर पाईपने मारून फॅक्चर केले, तसेच शिवीगाळ केली व दोन्ही हातावर डोक्यात पाईपने मारहाण केली, डावा हात फॅक्चर झाला आहे तसेच डोक्यात चार टाके पडले आहेत.
शरद हणुमंत खोमणे याने या मारहाणी प्रकरणी ओंकार दादा चोरमले याचे विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फलटण पोलीस करत आहेत.