महाराष्ट्र न्यूज, महाबळेश्वर : पाचगणी येथील नगरपालिका शाळेत पोलीस प्रशासन व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची व पोलीस पाटील यांची बैठक पार पडली. या वेळी वाईचे प्रांत राजेंद्र जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी मॅडम, वाईच्या डीवायएसपी शितल जानवे-खराडे मॅडम, महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील मॅडम, पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर साहेब, प्रमुख उपस्थित होते.
डीवायएसपी शितल जानवे-खराडे मॅडम व पाचगणीचे एपीआय सतीश पवार साहेब म्हणाले गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे काटेकोर पालन सर्वांनी करावे. तसेच सॅनिटायझर मास्क याचा वापर करावा. तसेच सुरक्षित अंतर ठेवले जाईल याची काळजी घेतली पाहिजे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असे सांगितले. त्याच बरोबर महावितरण चे अधिकारी बाचल साहेब यांनी मंडळांना तात्पुरते लाईट कनेकशन घेण्याच्या सूचना केल्या. कोणताही अपघात घडूनये म्हणून मंडळांनी कुणाच्याही घरातून किंवा मीटर मधुन कनेक्शन घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले. या वेळी शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी व पोलीस पाटील उपस्थित होते.