फेस्टिव्ह ग्रीटिंग पॅक्सना देणार नवीन लुक
सातारा : अद्वितीय उपक्रमाचा भाग म्हणून नेस्ले इंडियाने माऊथ अॅण्ड फूट प्रिंटींग आर्टिस्ट्स (एमएफपीए) सोबत सहयोग केला आहे, आणि दिवाळीसाठी दोन फेस्टिव्ह ग्रीटिंग पॅक्सची निर्मिती केली आहे. या फेस्टिव्ह ग्रीटिंग पॅक्समध्ये मंजीभाई रमाणी आणि मनोज भिंगारे या दोन आर्टिस्ट्सच्या कलाकृतीचा समावेश आहे. हे पॅक्स एमएफपीए आर्टिस्ट्सचा उत्साह, त्यांचा निर्धार, त्यांच्या प्रतिभेला प्रशंसित करतात आणि त्यांची सर्जनशीलता व चिकाटीची गाथा सांगतात.
या उपक्रमाबाबत सांगताना नेस्ले इंडियाच्या कन्फेक्शनरीच्या संचालक रूपाली रत्तन म्हणाल्या, एमएफपीए येथील आर्टिस्ट्समध्ये प्रतिभा, चिकाटी व नम्रतेचे सर्वोत्तम संयोजन आहे. हा सहयोग आम्हाला यंदा दिवाळीच्या सणादरम्यान त्यांच्या सर्जनशीलतेला प्रशंसित करण्याची संधी देतो. आमचे नेस्ले फेस्टिव्ह ग्रीटिंग्ज पॅक्स या आर्टिस्ट्सची कथा आणि त्यांच्या अद्वितीय कलेला सादर करतात. मला आनंद होत आहे की, नेस्ले इंडियाकडून त्यांची कलाकृती डिजिटल वैयक्तिकृत ग्रीटिंग कार्डस् म्हणून वापरली जात आहे, आणि त्यांच्या कलेचा देशभरात आनंद पसरवण्यासाठी वापर केला जात आहे.

याप्रसंगी बोलताना एमएफपीए येथील विपणन प्रमुख बॉबी थॉमस म्हणाले, एमएफपीएला यंदा दिवाळीला फेस्टिव्ह ग्रीटिंग पॅक्स डिझाइन करण्यासाठी नेस्ले इंडियासोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. एमएफपीए येथील आमचे माऊथ अॅण्ड फूट आर्टिस्ट्स या विशेष उपक्रमाचा भाग असण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. सर्वांसाठी वर्ष खडतर राहिले असताना आम्हाला विश्वास आहे की, आमच्या दिव्यांग आर्टिस्ट्सनी डिझाइन केलेले दिवाळी ग्रीटिंग पॅक्स यंदाच्या सणासुदीच्या काळामध्ये उत्साह पसरवण्यासोबत आशेचा किरण जागृत करतील.
तसेच आणखी एका उपक्रमामध्ये नेस्ले इंडिया मुंबई, पाँडिचेरी, मुन्नार, महाबळेश्वर, पोंडा, नैनीताल, मसुरी व डलहौसी येथील ५००० सफाई कामगारांना आसपासचा परिसर व शहरे स्वच्छ ठेवण्याच्या कामाच्या कौतुकाचे प्रतीक म्हणून त्यांचे कन्फेक्शनरी उत्पादने देखील भेट म्हणून देणार आहे.






















