महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील अकोले गावचे सुपुत्र मेजर सतीश सोनवणे हे भारतीय सैन्य दलातून सेवा करून निवृत्त झालेबद्दल त्यांच्या गावी अकोले येथे जावून इंदापूर तालुक्याचे युवा नेते व नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी गुणगौरव करून यथोचित सत्कार केला .
सीमेवरील लढणारे सैन्याबद्दल प्रत्येक भारतीयांना अभिमान असतो , आम्हालाही आहे . आपल्यातील प्रत्येकाला तो असायला हवा असे मत पाटील यावेळी व्यक्त करून मेजर सतीश सोनवणे यांचे पुढील आयुष्य भरभराटीचे व आरोग्यदायी जावो , अशा शुभेच्छा दिल्या यावेळी युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .