महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना सन.२०१९-२० या आर्थिक वर्षातील देय व थकीत अनुदान ३० कोटी ९३ लाख ७५ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली .
हा निधी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास वितरित व खर्च करण्यास ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय यांना मान्यता देण्यात आली आहे. सन. २०२०-२१ या आर्थिक वर्षात कला व संस्कृती, सार्वजनिक ग्रंथालये , मध्यवर्ती , जिल्हा व तालुका ग्रंथालये यांना सहाय्यक अनुदानासाठी १२३ कोटी ७५ लाख रुपये एवढा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे .