तीस वर्षे अखंड कृषी क्षेत्रात यशस्वी परंपरा जपणारे भोसले कृषी उद्योग आता ओगलेवाडीत
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : विरवडे गावाला शेतीची जुनी व अखंड परंपरा आहे. पूर्वीपासूनच विरवडे गाव हे सधन व शेतकऱ्यांची परंपरा असलेले गाव आहे. हनुमान दूध डेरी विरवडे चे चेअरमन शंकरराव तुकाराम भोसले यांनी आपल्या समाज कार्यातून गावाला एक वेगळी दिशा दिली. त्याचबरोबर विजयसिंह शंकरराव भोसले,संचालक रामदास विविध विकास कार्यकारी सोसायटी विरवडे यांचेही कार्य व गावासाठी मोलाचे योगदान अगदी वाखागण्याजोग आहे.भोसले परिवार परंपरेनुसार राजकारण व समाजकारण यामध्ये खूप अग्रेसर आहे.गेली अखंड तीस वर्षे कृषी क्षेत्रातील यशस्वी परंपरा असणारे भोसले कुटुंबाचे “भोसले कृषी उद्योग” आता एका नव्या रुपात ओगलेवाडी येथे सेवेत रुजू होत आहे. नवनवीन खते बी-बियाणे आधुनिक शेतकऱ्यांसाठी लागणारी सर्व साधन सामग्री हे आता भोसले कृषी उद्योग येथे शेतकऱ्यांना अगदी योग्य दरात मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्याला पायपीट किंवा गाडी भाडे देऊन कराडलाजाण्याची मुळीच आवश्यकता नाही. त्यामुळे प्रामाणिकपणा व खऱ्या सचोटीला उतरणारे हे भोसले कृषी उद्योग नावारूपाला आले आहे. त्यांच्या नावाचा डंका कराड सारख्या मोठ्या शहरात पाहायला मिळतो.
अशा या भोसले कृषी उद्योगाचा सोहळा बुधवार दिनांक 1 जून 2022 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी धैर्यशील कदम दादा,सचिन नलावडे शेतकरी संघटनाश्री. शंकरराव तुकाराम भोसले (चेअरमन हनुमान दुध डेअरी, विरवडे)श्री. शिवाजी तुकाराम भोसलेश्री. संग्रामसिंह भिमराव भोसलेश्री. अभयसिंह शंकरराव भोसले (संचालक, रामदास वि.वि. कार्य. सोसायटी, विरवडे)श्री. विजयसिंह शंकरराव भोसले त्याचबरोबर समस्त भोसले व मित्रपरिवार विरवडे, सर्व शेतकरी मित्र मंडळ ओगलेवाडी विभाग भोसले कृषी उद्योग या संस्मरणीय अशा सोहळ्याला उपस्थित होते.