महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
‘एक गाव एक गणपती’साठी गणेशोत्सव मंडळांना केले भावनिक आवाहन
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळावी म्हणून सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार हॉल येथे गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, सदस्य व पोलीस पाटील यांच्या मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हंकारे यांनी गणेशोत्सव मंडळांना ‘एक गाव एक गणपती‘ बसविण्याचे भावनिक आवाहन केले. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. त्याच बरोबर शासनाने ज्या नियमावली सांगितल्या आहेत त्याचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची मुर्ती ही चार फूटापेक्षा जास्त असू नये, आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नयेत. गणेशोत्सवाच्या सजावटीमध्ये भपकेपणा असू नये, गणेश दर्शनासाठी गर्दी होवू नये म्हणून फेसबुक व व्हिडीव्ही माध्यमांचा वापर करावा, गणेशोत्सवात होणारा खर्च हा गावातील नागरिकांसाठी मास्क, सॅनिटायझर, व्हीटामीन सी, अर्सेनिक अल्बम च्या गोळ्या, गरजूंना धान्य वाटप करण्यासाठी करावा. तसेच रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीरांचे आयोजन करावे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवावेत, गणेश आगमनापूर्वी गणेश मंडळांनी धर्मादाय संस्थेकडून परवानगी काढावी त्यासाठी लागणारी पोलीस स्टेशनची परवानगीसाठी यासंकेतस्थळावरुन माहिती भरावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाचा सहकार्य करावे असे ही आवाहन पोलीस निरीक्षक हंकारे यांनी केले.
यावेळी सातारा तालुक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, तसेच गणेश मंडळाचे प्रमुख, सदस्य, अविनाशा भोसले पाटील, गजानन चवरे पाटील, विलास माने पाटील, विष्णू लोहार पाटील, महेश रोकडे पाटील, तसेच तालुक्यातील पोलीस पाटील मिटींगसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस हवालदार दीपक पोळ, राजू मुलाणी व तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी प्रयत्न केले.