महाराष्ट्र न्यूज फलटण/ गणेश पवार:
फलटण तालुक्यातील झिरपवाडी या गावांमध्ये माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली असून नराधम धनंजय बाजीराव गायकवाड याने भेळ खाण्याचे अमिष दाखवून ७ व ४ वर्षे वयाच्या दोन लहान बालिकांवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली असून याच्यावर फलटण शहर पोलीस स्थानकात भा द वि स कलम ३७६(२),५०६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल झाला असून तिथून मिळालेल्या अधिक माहितीनुसार,झिरपवाडी गावातील नराधम धनंजय बाजीराव गायकवाड याने स्वतःच्या राहत्या घरात पीडित बालिकांना भेळ खाण्याचे अमिष दाखवून दि २६ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अत्याचार केला. विशेष म्हणजे दुसरी ४ वर्षाची बालिका नराधमाच्या चुलत भावाची मुलगी आहे.याबाबत कोणाला काही सांगायचे नाही असा दम दिला या वेळी पीडित मुलीचे वडील पंढरपूर याठिकाणी गाडी भाडे घेऊन गेले असल्यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना माघारी घरी आल्या नंतर सदर घटना सांगितली व आज दि ३० रोजी फलटण शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली असून नराधम आरोपीस पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्याचा अधिक तपास फलटण शर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी के किंद्रे व स्वाती धोंगडे फलटण ग्रामीणच्या पोलीस उप निरीक्षक करीत असून संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये सदर घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे.