कोरेगाव येथील ह भ प श्री निवृत्तीनाथ सुतार यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव येथे विविध समाजोपयोगी उपक्रम साजरे करून अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले.

कोरोना परिस्थितीमध्ये सर्वत्र अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आपल्या वाढदिनी समाजोपयोगी उपक्रम म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत तर गरजूंना अन्नधान्याचे वाटप करून कोरेगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ह भ प निवृत्तीनाथ सुतार यांनी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे यावेळी, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगरसेवक राहुल बर्गे, युवा नेते राहुल प्रकाश बर्गे, चेअरमन शिवलिंग बर्गे, रितेश बर्गे, उदयभाऊ बर्गे, फत्तेसिंग बर्गे, पांडुरंग सुतार, संदीप सुतार, चेतन सुतार व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये ही मदत देण्यात आली.
































