सातारा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोवई नाका येथे नवाब मलिक यांचा प्रतिमेला फासले काळे
सातारा : १९९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील शिक्षा भोगत असलेले आरोपी व अतिरेक्यांशी जाहीर संबंध असलेल्या महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब बरखास्त करावे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील पोवई नाका येथे आंदोलन केले.
यावेळी नवाब मलिक, महाविकास आघाडी राज्य सरकार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या आणि नवाब मलिक यांच्या फोटोला काळे फासण्यात आले.
यावेळी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील, शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, ऍड. प्रशांत खामकर, सातारा शहर सरचिटणीस प्रविण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, नितीन कदम, तालुका उपाध्यक्ष विक्रम पवार, चिटणीस रवि आपटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विक्रम बोराटे, जिल्हा उपाध्यक्ष किरण गोगावले, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सुजित साबळे, महिला मोर्चा शहराध्यक्ष रीना भणगे ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनिशा शहा, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष कुंजा खंदारे, सरचिटणीस अश्विनी हुबळीकर , ओबीसी मोर्चा युवती जिल्हाध्यक्ष वनिता पवार, माजी नगरसेवक किशोर पंडित, आरोग्य सेवा आघाडी जिल्हाध्यक्ष आप्पा कदम, सिनेकलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमित भिसे, अनुसूचित जाती मोर्चा शहर सरचिटणीस विक्रम अवघडे, कायदा आघाडी शहराध्यक्ष ऍड. सुरज मोरे, सोशल मीडिया उपाध्यक्ष अभिजीत लकडे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संतोष कदम, अमोल माने, शार्दूल वायदंडे, दर्शन पवार, रमेश माने, आण्णा माने, प्रमोद अहिरे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






















