ग्रामपंचायत हजारमाची(स.गड), व सत्ताधिकारी विकास कामाच्या नावाखाली जनतेची फसवणूक,दिशाभूल करतायत:बापूसाहेब लांडगे,सामाजिक कार्यकर्ते
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : ग्रामपंचायत हजार माची (स.गड) यांचा अनागोंदी कारभार व गटविकास अधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत कार्यालयातील सत्ता अधिकारी विकासकामांच्या नावाखाली जनतेची फसवणूक व दिशाभूल आजवर करत आले आहेत. ग्रामपंचायतीच्या या कार्यपद्धतीला कंटाळून बापूसाहेब लांडगे यांनी तीन दिवसांपूर्वी प्रांत कार्यालय कराड येथे उपोषण सुरू केले. मात्र अद्यापही प्रशासन असो वा ग्रामपंचायत सदस्य कोणीही याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आपला लढा तीव्र करण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते तसेच विश्व इंडियन पार्टी चे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी आपल्या वक्तव्यात केला.सत्ता अधिकाऱ्यांनी तात्पुरती काम करून नागरिकांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली आहेत. नागरी सुविधेला सरकारी फटका तर बसलाय पण नागरिकांचे हाल होत असताना वरिष्ठांचा कानाडोळा का? ग्रामपंचायतीवर कारवाईच्या नावाखाली फक्त कागदी घोडे कामाचं नाही. ग्रामपंचायत नागरिकांना सुख सोयी तर पुरवत नाहीत,पण पंचायत समितीकडे फक्त आणि फक्त पत्रव्यवहार करत आहेत. जिल्हा परिषद तर अक्षम्य दुर्लक्ष करत आहे, लोकप्रतिनिधी जनतेच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत का? जर घेणार नसतील तर मग आम्हाला न्याय कोण देणार? गावाचा विकास कोण करणार?गावातील लोकांना नागरी सुखसुविधा कोण पुरवणार ?असा प्रश्न उपोषणकर्ते यांनी प्रशासनाला विचारला आहे .ग्रामपंचायत हजारमाची कार्यालयांतर्गत सप्टेंबर 2020 रोजी सदाशिव कॉलनी ते मळाबोर्ड 1 व 2 याठिकाणी बंदिस्त गटार चे काम चालू होते,पण ते काम अद्याप पूर्ण का झाले नाही? 12 ऑगस्ट 21 रोजी हजारमाची ग्रामपंचायत कार्यालयामार्फत सरपंच उपसरपंच ग्राम विकास अधिकारी यांनीग्रामपंचायत कार्यालयात नागरिकां ची मीटिंग घेऊन लेखी पत्र देऊन त्या ठिकाणावर बंदिस्त गटर पक्का, मुरूम व कॉंक्रिटीकरण करून देऊ असे बोलले होते ,पण आज अखेर हेही काम ग्रामपंचायतीस पूर्ण करता आले नाही.31 ऑगस्ट 21 ग्रामसभा ठराव क्रमांक 2 ने पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्याकडे कॉंक्रिटीकरण करण्याकरता निधी देण्यात यावा तो रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण साठी होता .

पण आज अखेर पूर्ण झालेला नाही. 18 एप्रिल 2022 पंचायत समिती कराड यांनी पत्र दिले व बंदिस्त गटार मुरमीकरण, कॉंक्रिटीकरण पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर पूर्ण करण्यात यावे असे पत्र दिले तरीसुद्धा अद्याप त्यावर हालचाल नाही.अशा वेगवेगळ्या व नागरी सुविधांसाठी मागण्या मान्य होत नसल्यामुळे नाइलाजास्तव उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला असं बापूसाहेब लांडगे यांनी नमूद केलं. आपल्या मागण्यांचा विचार जर झाला नाही, तर टोकाचं पाऊल उचलण्यात येईल जर जीवाच बर वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी हजारमाची ग्रामपंचायत व प्रशासन जबाबदार राहील अशा पद्धतीचा इशारा यावेळी त्यांनी दिला.






















