महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय विश्वासराव रणसिंग यांची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम , मृद व संधारण , वने , पशुसंवर्धन , दुग्ध व मत्स्य व्यवसाय , सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी येथे करण्यात आले .
यावेळी रणजित निंबाळकर , श्रीकांत बोडके , पोलीस पाटील तुषार झेंडे , विनायक चांदगुडे , सुनिल खंडाळे , उपसरपंच अजित पवार , हौसीराम चांदगुडे , बाळासाहेब चांदगुडे , रामदास चव्हाण , शाळेचे मुख्याध्यापक महादेव वणवे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामस्थ व आदी मान्यवर उपस्थित होते .






















