महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बिदाल
यंदाच्या वर्षांमध्ये खाजगी शिक्षण संस्था कडून विद्यार्थ्यांना फी सवलत मिळावी हे महत्वाचे आहे. काही शिक्षण संस्था सतत पालकांना फोन करून वसुली करण्याचे काम सुरु आहे . राज्यातील खासगी शिक्षण संस्थांकडून या विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहे . अन्यथा फी सवलतीसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे माण तालुका विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष शरद दडस यांनी दिली.
खाजगी शिक्षण संस्था कडून चालू शैक्षणिक वर्ष मध्ये फी सवलत मिळावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीच्या वतीने दहिवडी येथे तहसीलदार यांना निवेदन माण-खटाव विधानसभा अध्यक्ष मा सचिन होनमाने सर व विद्यार्थी जिल्हाध्यक्ष आकाश विरकर यांच्या मार्गदर्शनाखाली.हे निवेदन देण्याच्या वेळी यावेळी तालुकाध्यक्ष शरद दडस, दादासाहेब माळवदे, हणमंत दडस, श्रीकांत सावंत ,धनाजी दडस,आदर्श दडस यांनी निवेदन दिले. खाजगी शिक्षण संस्था भरमसाठ फी वसुल करत आहेत. लाँकडाउनच्या काळात पालक वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांनी फी मध्ये सवलत द्यावी असे निवेदन देण्यात आले.






















