सातारा : स्थानिक गुन्हे शाखा सातारा धडक कारवाई करत, दोन अज्ञानांकडून ४ मोटर सायकल जप्त केले आहे, तसेच त्यांची अधिक चौकशी करत असता आणखी ३ गुन्हे उघड केले आहेत.
अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, अजित बोहाडे अपर पोलीस अधिक्षक सातारा यांनी मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना आदेश दिलेले होते. किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ व पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे दि.२२/९/२०२१ रोजी गणेश वाघ पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी पथकास दोन अज्ञात गुन्हेगार खिंडवाडी ता.जि. सातारा येथे दोन मोटर सायकल विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळालेने, त्यांनी पथकासह खिंडवाडी ता.सातारा येथे सापळा लावुन दोन अज्ञात ताब्यात घेऊन त्यांचेकडुन एकुण २ मोटर सायकली जप्त केल्या आहेत. तसेच त्यांचेकडे अधिक चौकशी करुन त्यांचेकडुन त्यांनी चोरलेल्या आणखी दोन मोटर सायकल त्यांचे घराजवळुन जप्त केल्या आहेत. जप्त मोटर सायकलीबाबत सातारा जिल्हा पोलीस अभिलेखाची पडताळणी केली असता, आणखी ३ गुन्हे उघड केले आहेत. एक मोटर सायकलबाबत आद्याप काहीएक माहिती उपलब्ध झाली नसुन त्याबाबत तपास चालु आहे. सदर आरोपींना पुढील कारवाई कामी सातारा शहर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, अजित बोहाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा, किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, सहा.पोलीस उपनिरीक्षक तानाजी माने, पो.हवा. सुधीर बनकर, विश्वनाथ सपकाळ, पो.ना. अजित कर्ण, प्रविण कांबळे, प्रविण पवार, पो.कॉ. शिवाजी भिसे, केतन शिंदे, धिरज महाडीक, संकेत निकम, चालक पो.ना. विजय सावंत यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाईमधील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, अजित बोहाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.