महाराष्ट्र न्यूज तालुका प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले(इंदापूर)
भारतीय जनता पक्षाची पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली असून त्यामध्ये आज सोमवार , दि. १७ ऑगस्ट रोजी पुणे येथे झालेल्या कार्यकारिणी सभेत जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी कार्यकारिणी जाहीर केली आहे .
यामध्ये इंदापूर तालुक्यातील कळंब येथील प्रदीप विश्वासराव पाटील यांना उपाध्यक्ष पदावर संधी मिळाली असून सचिव म्हणून मानकरवाडीचे तानाजी साहेबराव थोरात यांना संधी देण्यात आली आहे . त्याचबरोबर इतर मागासवर्गीय मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून नानासाहेब किसन शेंडे यांना संधी दिली आहे . तसेच भटके – विमुक्त मोर्चा अध्यक्षपदी शिवाजी तरंगे , शिक्षक मोर्चाच्या अध्यक्षपदी वालचंदनगरचे संतोष कदम यांना संधी देण्यात आली आहे .
सदरच्या निवडी वेळेस पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरिश बापट , माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील , माजी मंत्री बाळासाहेब भेगडे , दौंडचे आमदार राहुल कुल व आदी मान्यवर व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते