महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :वाई
रिलायन्स कंपनीच्या आणि रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या आर्थिक तडजोडी मुळे वेळे ते रायगाव फाटा दरम्यान असणाऱ्या बदेवाडी (भुईंज), सुरुर, वेळे या सातारा पुणे -पुणे सातारा महामार्गा वरील असणाऱ्या भुयारी मार्गा मध्ये काही ठिकाणी गेले चार-पाच दिवस पडत असणाऱ्या पावसाच्या पाण्याने काही ठिकाणी गुडघा भर तर काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साठल्याने महामार्गाच्या दुतर्फा असणार्या भागातील नागरिकांना व दुचाकी स्वारांसह पादचार्यांना जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
सातारा ते पुणे ते सातारा या मार्गाचे गेल्या दहा वर्षापूर्वी रस्ते महाविकास महामंडळाच्या देखरेखी खाली रिलायन्स कंपनीने या सहा पदरी करनाचे काम घेतले होते. ते काम निकृष्ट दर्जाचे होत असताना सातारा व पुणे जिल्ह्यातील आमदार खासदार व सर्व राजकीय पक्षांच्या लोक प्रतिनिधीनी आंदोलने करून बरेच ठिकाणी चालू काम बंद पाडून त्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्या कडे वेळो वेळी करून रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगल्या प्रतीचा असावा असा आग्रह धरला होता.
तरी देखील रिलायन्स कंपनीने नेमलेले सप ठेकेदारांनी दर्जात्मक कामे न केल्याने आज सहा पदरी असणाऱ्या सातारा पुणे पुणे सातारा या रस्त्याची पडलेल्या पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी दोन ते अडीच फुटाचे गोल आकाराचे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्त्यांना धावत असणाऱ्या अवजड वाहनाचा भार पेलवत नसल्याने गौरीशंकर परिसरात जागो जागी रस्ते खचले असून या दयनीय अवस्थे मुळे सुसाट धावणाऱ्या वाहनांची चाके पडलेल्या खड्ड्यान मध्ये आदळून भीषण अपघाताची मालिका सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याच बरोबर भुयारी मार्गांचीही सुद्धा दयनीय अवस्था झाली आहे. या गंभीर विषयाकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन लक्ष देईल का असा सवाल वाहन चालकांन मधून विचारला जात आहे.