महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/ सातारा: वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी सातारा पोलिस अधीक्षक अजय कुमार, अपर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे शाहुपूरी पोलिस ठाणे हाद्दीत राहणाऱ्या पिल्या उर्फ विजय राजू नलवडे यांच्याविरोध्दात MPDA (एमपीडीए) कायद्यांर्गंत कारवाई कारण्यात आली. सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी कार्यभार स्विकारल्या तीन इसमांच्या विरूध्द MPDA (एमपीडीए) कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केल्या आहेत.
स्थानबध्द आरोपी पिल्या उर्फ विजय राजू नलवडे रा ४३९, मंगळवार पेठ सातारा,वय ३० वर्षे यांच्या विरूध्द MPDA (एमपीडीए) कायद्यान्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव एस.जे.पतंगे व पोलीस निरीक्षक शाहुपूरी पोलीस ठाणे यांनी सादर करण्यात आला होता.किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक व स्थानिक गुन्हा शाखा,सातारा यांनी पडताळणी करूण अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा,धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा व आँचल दलाल सहायक पोलीस अधीक्षक सातारा शहर विभाग सातारा यांचे मार्फतीने जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी दंडाधिकारी सातारा यांच्याकडे सादर केले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हाधिकारी दंडाधिकारी सातारा यांनी स्थानबध्द इसमाने दरोड, जबरी चोरी, खंडणी, बेकायदेशिर जमाव जमवणे, लोकसेवकास त्यांचे कत्यर्व पार पाडण्यापासूण परावृतत करण्याकरीता धाक दाखवणे,दुखापत, दुखापत/ हमला करण्याची पूर्वतयारी करुन गृह अतिक्रमण करणे असे गुन्हे केलेले आहेत तसेच स्थानबध्द इसमाकडून सार्वजनिक शांततेस बाधा उत्पन्न होणारी कृत्ये होत असल्याने व तो धोकादायक व्यत्की झाल्याची खाञी झाल्याने त्यास स्थानबध्द करण्याचेल आदेश दि. १८ ऑगस्ट २०२१ रोजी काढले होते .त्याप्रमाणे स्थानबध्द इसम पिल्या उर्फ विजय राजू नलवडे रा ४३९ ,मंगळवार पेठ सातारा,वय ३० वर्षे यास दि.१९.ऑगस्ट २०२१ रोजी सातारा जिल्हा कारागृहात येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा, आँचल दलाल सहायक पोलीस अधीक्षक सातारा शहर विभाग सातारा, किशोर धुमाळ पोलीस निरीक्षकन स्थानिक गुन्हे शाखा, संजय पतंगे पोलीस निरीक्षक शहुपूरी पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, साताराचे पोलीस हवालदार प्रवीण शिंदे,पोलीस नाईक स्वप्निल कुंभार यांनी MPDA (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यासाठी विशेष परिश्रम केले आहेत.
































