महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (इंदापूर)
नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी हे आपल्या गाव-भेट दरम्यान प्रवास करत असताना मौजे शहाजीनगर नजीक नीरा भीमा कारखाना रस्त्यावर एक छोटासा अपघात झाला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले .
गणपत बोबडे व त्यांचा मुलगा दुचाकीवरून प्रवास करत असताना त्यांच्या गाडीला शेळी आडवी आल्याने हा अपघात घडल्याचे बोबडे व त्यांचा मुलगा जखमी झालेचे समजताच पाटील यांनी त्यांच्याकडे धाव घेतली .
अपघातग्रस्तांची झालेल्या जखमेची पाहणी करत पाटील यांनी स्वतःचा मोबाईल नंबर देत, मी मदत करतो , असे सांगितले , आणि काटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फोन करून तेथील डाॅक्टरांना सेवा करण्यास सांगितले .
राजवर्धन पाटील यांनी ह्या पूर्वी पळसदेव काळेवाडी येथे झालेल्या अपघात ग्रस्तांना स्वतःच्या गाडीमध्ये भिगवण येथील हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते . त्यामुळे त्यांचा जीव वाचला होता , यानंतर हि घटना घडली आहे .