महाराष्ट्र न्यूज प्रतिनधी :वालचंदनगर:
वालचंदनगर गावचे सुपुत्र संतोष कदम यांची पुणे जिल्ह्य ग्रामीण शिक्षक मोर्चाच्या अध्यक्षपदी कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय कुरवली येथील ज्येष्ठ शिक्षक,व शिवाजी सेवक पतसंस्थेचे संचालक संतोष कदम यांची भारतीय जनता पार्टीच्या “पुणे जिल्हा शिक्षक मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षपदी ” निवड संतोष कदम, हर्षवर्धन पाटील यांचे अत्यंत विश्वासू, एकनिष्ठ व तळमळीचे कार्यकर्ते. शैक्षणिक क्षेत्रात दिलेले अभूतपूर्व योगदान, तसेच सामाजिक कार्याची असलेली आवड पाहून माजी या अगोदरच त्यांची इंदापूर तालुका शिक्षक सेलच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवलेली आहे. या निवडीनंतर कदम त्यांचे कार्य अत्यंत जोमाने व तळमळीने पुढे चालू ठेवले. शिक्षक सेलच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले.
शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला. समाजातील गरजू, गरीब लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच ते अग्रेसर असतात.पक्षा प्रति त्यांची असलेली निष्ठा,तळमळ शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात दिलेले भरीव योगदान,यामुळे त्यांची या पदावर झालेली निवड ही खरोखरचं अभिमानास्पद व त्यांच्या कार्याची पोचपावतीच म्हणावी लागेल.सदर निवडीच्या वेळीच अनेक नियुक्ती पत्र पुणे जिल्ह्य माजी पालकमंत्री खासदार गिरीश बापट, माजी सहकारीमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे ,आमदार राहुल कुल , पुणे जिल्हा अध्यक्ष गेणश भेगडे,भारतीय जनता पार्टीच्या अनेक मान्यवर उपस्थित होते. इंदापूर तालुका गेली अनेक वर्षे कदम शिक्षकांचे प्रशन सोडवित सतत शिक्षकांबद्दल काम करीत आले आहेत.
या शिक्षक मोर्चाच्या अध्यक्षपदीच्या माध्यमातून व भारतीय जनता पार्टी पक्षाचे बळकटीकरणातून शिक्षकाचे प्रशन सोडवू असे कदम महाराष्ट्र न्यूज बोलत होते. संतोष कदम यांच्या निवडीबद्दल वालचंदनगर ,इंदापूर तालुका सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.