पाटण नगरपंचायत सतर्क
महाराष्ट्र न्यूज पाटण प्रतिनिधी :
पाटण तालुक्याचा कोरोनाचा आकडा हा वाढत असून ते कमी करण्याचा आणि नियंत्रीत करण्याची जबाबदारी जशी प्रशासनाची आहे तेवढीच जबाबदारी नागरिकाची आहे .प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन नागरिकांनी न केल्याने पाटण तालुक्यात आता कोरोना बाधिताचा आकडा 1404 पर्यत पोहचला आहे तालुका प्रशासना, अरोग्य विभाग, शहरातील नगरपंचायत यांच्या वतीने ” माझे कुटूंब आणि माझी जबाबदारी ” या अभियांनाला तालुक्या बरोबर शहरात सुरुवात झाली असून नगरपंचायत च्या वतीने सुक्ष्म नियोजन केले गेले. या माध्यमातुन आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकाच्या,नगरपंचायत कर्मचारी याच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक कुटुंब आणि घर माझे कुटूंब आणि माझी जबाबदारी ” या अभियान पासून कोणीही वंचित राहू नये यांची काळजी प्रभाग समिती, नगरसेवक आणि मुख्यअधिकारी घेताना दिसत आहे.
तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना तो पाटण शहरात नियंत्रित करणे साठी नगरपंचायत कर्मचारी,अधिकारी कसून प्रयत्न करत आहेत कोरोना शहरातील वाढता प्रभाव लक्षात घेता,शहरातील कोरोना नियंत्रण राहणेसाठी शासनाने सुरू केलेल्या ” माझे कुटूंब माझी जबाबदारी ” चे अभियान हे शहरात प्रभावी राबविण्याची जबाबदारी ही नगरपंचायतच्या सर्व अधिकारी यांनी घेतली आहे या नगरपंचायत च्या वतीने अभियानावर एक नोडल अधिकारी नेमण्यात आले असून , 6 सुपरवायझर ची देखील नेमणूक केली असून, 11 आशा सेविका, तर 31 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, नगरपंचायतचे सर्व कर्मचारीच्या मध्यामातून शहरातील प्रत्येक प्रभागातील जवळपास 2500 कुटुंबा पर्यत घर टू घर जावून उच्चरक्तदाब, शुगर इ. माहिती सोबतच जेष्ठ नागरिकांची त्यांच्या शरिरातील ऑक्सीजनची पातळीची तपासणी करून त्यांना आरोग्य मार्गदर्शन करून त्यांची माहिती नगरपंचायतकडे संकलित केली करत आहे तर शहरातील 3520 नागरिकाच्यावर नगरपंचायत च्या वतीने विशेष लक्ष दिले जात आहे ज्यांना औषधे उपचाराची गरज आहे अशाना तात्काळ अरोग्य विभागाची संपर्क करून पाटण आणि मरळी या दोन्ही ठिकाणी उपचाराकरीता पाठविण्यात येते त्यांमुळे कोरोना बाधितांना तात्काळ आरोग्य सुविधा वेळेत मिळण्यास मदत होते. याच्या बरोबर कोरोना मुळे दुर्दैवी मृत्यू झालेल्या तालुक्यातील आणि अन्य तालुक्यातील 25 हुन अधिक लोकांच्यावर नगरपंचायत च्या वतीने अंत्यसंस्कार केले आहेत.
नगरपंचायतच्या माध्यमातून ज्याठिकाणी कोरोना बाधित रूग्ण सापडत आहेत अशा ठिकाणी नगरपंचायत कडून प्रभागात औषध फवारणी करून प्रभागातील नागरिकाची काळजी घेतली जात आहे . याबरोबच शरातील ज्येष्ठ नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी बाहेर जाणे टाळावे, सोशल डिस्टस्टिंग पाळावे, मास्क आणि सॅनिटायजर चा वापर करावाआदि सुचना देखील घर टू घर दिल्या जात आहे