महाराष्ट्र न्युज नवारस्ता प्रतिनीधी:-
नाडोली (हारुगडेवाडी) गावचे रहिवासी असलेल्या व मुंबई येथे शिक्षक म्हणून नोकरीस असलेले
नाडोली गावचे सुपुत्र यांना मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आर्दश शिक्षक महापौर पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.मुळचे नाडोली सारख्या छोटयाशा खेडेगावातील असलेले व मुंबई पब्लिक स्कूल देवनार कॅालनी मराठी शाळा क्रमांक 2 येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री शिवाजी आबा कदम यांचा शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बदल व जनसेवेच्या गौरवार्थ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर आमदार यामिनी जाधव आमदार राहुल शिंदे मुंबई
महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यासह विविध मान्यवर महानगरपालिका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.नाडोली गावातील रहिवासी असलेल्या शिवाजी कदम यांना मिळालेला हा पुरस्कार पाटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
आहे.या पुरस्कार सोहळ्यासाठी त्यांचे मोठे बंधू वकील दाजी कदम व त्यांचे कुंटुबीय तसेच नाडोली गावातील मुंबई रहिवासी मित्र परिवार मोठ्या संख्येने
उपस्थित होते या पुरस्काराचे मानकरी शिवाजी कदम यांचे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराजे देसाई यांनी विशेष अभिनंदन केले.या पुरस्काराबद्दल नाडोली गावातील ग्रामस्थांनी तसेच पाटण तालुक्यातील सर्व शिक्षण क्षेत्रातीलमान्यवर यांच्या कडून कौतुक होत
आहे.