पाटण दि. 19 ( प्रतिनिधी ) पाटण तालुक्यात मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात आणखी पंचवीस व्यक्तींचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला. तर कराड येथे एका बाधीताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत तालुक्यात एकूण 498 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली त्यापैकी तब्बल 312 व्यक्तींनी कोरोनावर मात केली यात 26 व्यक्तींचा मृत्यू झाला असून सध्या 160 बाधीतांवर विविध रूग्नालयात उपचार सुरू असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली.
मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात तळमावले येथील 43 वर्षीय महिला, 59 वर्षे पुरूष, सणबूर 62, 42 वर्षीय पुरूष, 60, 13 वर्षे महिला, पाटण येथील 73, 45, 78 वर्षे महिला 52, 54 वर्षे पुरूष , धामणी 47 वर्षे पुरूष 20 वर्षे महिला , रामिष्टेवाडी 69 वर्षे पुरूष , तारळे 34 वर्षे पुरूष, गारवडे 30, 37 वर्षे पुरूष, 45, 32, 15 वर्षे महिला, दिवशी बुद्रुक 52, 59 वर्षे महिला, मारूल हवेली 47 वर्षे पुरूष या पंचवीस व्यक्तींचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्या संपर्कातील कुटुंबीय, नातेवाईक आदी हाय रिस्कमधील व्यक्तींना इन्स्टीट्युशल क्वारंटाइन करण्यात आले आहे. बुधवारी वजरोशी येथील 28 वर्षे महिला, पाटण येथील 30, 48 वर्षे महिला, मारूल हवेली 10, 8, 4 वर्षे बालिका अशा सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडून आगामी सात दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. पाटण येथील एका 69 वर्षे पुरूषाचा कराड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने त्यांचेवर स्थानिक नगरपालीकेकडून कोवीड निकषांनूसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तालुक्यातील 160 बाधीतांवर कृष्णा, सह्याद्री हाॅस्पीटल कराड, सिव्हिल हाॅस्पीटल सातारा व कोरोना केअर सेंटर पाटण येथे तर ज्यांना कोरोना झाला आहे परंतु त्यांच्यामध्ये कोणतीही कोरोना लक्षणे आढळून आली नाहीत व घरी त्यांच्याकडे सुविधा उपलब्ध आहे अशांना होम क्वारंटाइन करून तेथे पुढील उपचार सुरू आहेत. या बाधीतांच्या संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक आदी हाय रिस्कमधील व्यक्तींना पाटण येथील प्रियदर्शनी महिला वसतीगृह, मिल्ट्री बाॅइज होस्टेल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जुने वसतीगृह व तळमावले येथील कोरोना केअर सेंटर तर काहींना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
-पाटण पंचायत समितीतील कर्मचारी बाधित
दरम्यान शहरात आत्तापर्यंत एकूण 75 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली. यात स्वॅब अहवालात बाजारपेठ परिसरातील दोन महिला व बुधवारी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन चाचणीत भोकरशेत येथील एक युवती व पंचायत समिती मधील एका कर्मचारी अशा आणखी चौघांना कोरोनाची लागन झाली. आतापर्यंत यात पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर 16 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे सध्या 64 बाधीतांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. बुधवारी घेण्यात आलेल्या स्वॅब चाचणीत तालुक्यातील दोन मुख्य वरिष्ठ अधिकारयांचाही समावेश असून याचे अहवाल गुरूवारी रात्री उशिरा येण्याच्या शक्यता आहेत. या मान्यवर अधिकारयांचे अहवाल काय येणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.