म्हसवड पोलिस स्टेशनच्या कारभारामुळे मेंढपाळ बांधवाचे हेलपाटे
कागदपत्र जमा न करून घेतात दिले उडवाउडवीचे उत्तरे
प्रतिनिधी
माण तालुक्यातील मेंढपाळ बापू बबन विरकर हे गेल्या दोन दिवसापासून वर्तणूक दाखला मिळण्यासाठी कागदपत्र जमा करण्यासाठी म्हसवड पोलीस स्टेशन येथे हेलपाटे मारत आहेत. मात्र गोपनीय विभागाचे कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे कागदपत्र सुद्धा जमा करून घेतली जात नाहीत.
लवकरच संबंधित मेंढपाळ बापू बबन विरकर यांना म्हसवड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर न्याय न दिल्यास संबंधित जिल्हाधिकार्यालय व सातारचे पोलीस अधीक्षक यांना भेटून म्हसवड पोलीस स्टेशनच्या कारभाराविषयी तक्रार करणार आहे. माण तालुक्यात लवकरच मेंढपाळांची एकत्र परिषद होणार आहे यामध्ये मेंढपाळांची संघटन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही ठिकाणी मेंढपाळ बांधवाला पोलीस स्टेशन न्याय देत नसेल तर थेट आमच्याशी संपर्क साधावा अशी माहिती मेंढपाळ आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहेत.