महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बिदाल
अमोल ओंबासे यांचे गेली सात वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत.पाणी फाऊंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, कमिन्स प्रोजेक्ट, बी जे एस, अफर्म, गोविंद डेरी,बारामती आॅग्रो,सह अन्य काही सामाजिक संस्था, रोजगार हमी योजना व शाशन, प्रशासकीय अधिकारी व प्रभाकर देशमुख , यांची मदत घेऊन त्यांनी वडगांव गावात करोडो रुपयांची विकासकामे केली आहेत.

पुढील काळात आपण वंचित तळागाळातील गोरगरीब,लोकांना,विद्यार्थ्याना,महिलांना, शेतकरी, कामगार,नोकरदार, मजूर,यांना जास्तीत जास्त वेळोवेळी,शक्य ती मदत करणार असल्याचेही अमोल ओंबासे यांनी सांगितले. अमोल ओंबासे यांना संस्थापक राहुल जाधवर,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष.मानसिंगराव माळवे,जिल्हा कोषाध्यक्ष. अरून खरमाटे,जिल्हा उपअध्यक्ष अप्पासाहेब ओंबासे, जिल्हा युवा अध्यक्ष प्रतीक वसंतराव खाडे, सह सर्व पदाधिकाऱ्यांनी,शुभेच्छा देऊन त्यांच्याकडे माण तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.






















