खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी केला फलटणला ४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजुर
फलटण प्रतिनिधी:- खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर व फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून फलटण नगर परिषदेचे विविध भागातील ४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र शासन वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य अश्वारूढ पुतळा -५० लाख रुपये व पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा अर्धपुतळा अहिल्याबाई होळकर चौक येथे बसविणे – २० लाख रुपये व ईतर विविध कामांना मिळून ४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी नगर विकास विभाग यांनी याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे.तसेच महात्मा जोतिबा फुले पुतळा सुशोभिकरण (खासदार फंड)-१५ लाख रुपये,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण (खासदार फंड)-१५ लाख रुपये मंजूर करण्यात आला आहे.
फलटण शहरातील मुख्य विविध पुतळ्यांना निधी मंजूर झाला असून यानिमित्ताने सर्व समाजातील समाज बांधवानी दिनांक ३०डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता महात्मा जोतिबा फुले चौक येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सकाळी १० वाजता केंद्रीय गृहराज्य मंत्री भारत सरकार मा अजयजी मिश्रा व खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या शुभहस्ते दुग्ध अभिषेक करण्यात येणार असल्याची माहिती फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.