बारामती ता.१४ -:
सुनिल निंबाळकर / बारामती प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सन २०२१-२०२२ सालचा ६० वा गव्हाण पूजन व गळीत हंगाम शुभारंभ अजित पवार उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि.१५ ऑक्टोबर २०२१ रोजी १०:२५ मि. होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती संजय जगताप आमदार पुरंदर – हवेली मतदार संघ तसेच मकरंद पाटील आमदार वाई – खंडाळा मतदारसंघ व सर्व सभासद उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. एन. यादव यांनी दिली. हा कार्यक्रम शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्स, मास्क सॅनिटायझर याचा वापर करीत सदर कार्यक्रम पार पडणार आहे याची नोंद घ्यावी.
































