साखरवाडी प्रतिनिधी होळ विविध कार्यकारी सेवा सोसायटी ता. फलटण येथील सोसायटीच्या निवडणुकीमध्ये राजे गटाने वर्चस्व निर्माण करून राजे गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येऊन ही निवडणूक १३-० अशी झाली विरोधकांनी आपले संपूर्ण अर्ज मागे घेऊन राजे गटाच्या हातांमध्ये एक हाती सत्ता दिली त्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे ना. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली होळ सोसायटीच्या चेअरमन पदी निवृत्ती सर्जेराव भोसले तर व्हा चेअरमन पदी विठ्ठल लक्ष्मण बोबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी शेखर साळुंखे यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली यावेळी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ सभासद हितचिंतक तसेच महानंद डेअरी मुंबई चे व्हा. चेअरमन डी के पवार, फलटण पंचायत समितीचे मा. सभापती शंकरराव माडकर होळ सोसायटीचे मा. अध्यक्ष सुरेश मानाजी भोसले, हनुमंत भिमराव भोसले, बाळासाहेब भोसले, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, संजय भोसले ,चंद्रकांत भोसले, दिलीप भोसले, मच्छिंद्र भोसले, पै. संतोष भोसले, सोसायटीचे सचिव राजेंद्र काकडे, तुकाराम कळसकर ,सुजित गरुड, सिताराम वारे, विठ्ठल जाधव ,इत्यादी उपस्थित होते तसेच यावेळी सतिश झाडगे यांनी सर्व संचालक व सभासद यांचे आभार मानल.
. होळ सोसायटीच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील आघाडीचे शिलेदार अभ्यासू व्यक्तिमत्व सोसायटीचे मा. व्हाईस चेअरमन विद्यमान संचालक सुधीर कांताराम भोसले यांची या निवडीच्या वेळी असणारी अनुपस्थितीची सभासदांच्या मधून चर्चा….
१) निवृत्ती भोसले. चेअरमन२) विठ्ठल बोबडे. व्हाईस चेअरमन