फलटण : गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण पोलीस ठाणे हद्दीतील 48 जणांना तात्पुरत्या स्वरूपात तडीपार करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक भारत केंद्रे यांनी दिली आहे. फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी फलटण शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आणि पोलीस रेकॉर्डवरील, शस्त्रअस्त्र बाळगणारे, मारामारी करणारे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्याच्या विरोधात तडीपार करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
तात्पुरत्या तडीपारामध्ये- राम वसंत पवार, राकेश राजेश पवार, रोहित संतोष अडागळे, उमेश नरसिंह पवार, लखन वसंत पवार, मंगेश प्रमोद तावडे रा. सोमवार पेठ फलटण , राहुल अंबादास गवळी, रोहन सुभाश मदने, कुणाल लालासाहेब भंडलकर, राजू बाळासाहेब शिरतोडे, रा. उमाजी नाईक चौक, फलटण, तर मलटण मधील ज्ञानेश्वर हनुमंत शिंदे, मयूर किसन शिंदे, किसन बाबुराव शिंदे, हनुमंत बाबुराव शिंदे, सूर्यकांत हनुमंत शिंदे, शिवाजी गेनबा शिंदे ,स्वप्निल शिवाजी शिंदे, रामदास माणिक शिंदे, अमोल किसन शिंदे, किसन गेनबा शिंदे, रा. ठाकूरकी, विजय सदाशिव गिरी, रा.मलटण, मनोज राजेंद्र हिप्परकर, नवनाथ तुकाराम पवार, विलास तुकाराम पवार, राहुल गणेश पवार, दिलीप तुकाराम पवार, साहिल विलास पवार, रुपेश विलास पवार, वरूण नरेंद्र कुचेकर, रोहन राजेश पवार, लहू रामस्वामी जाधव, विशाल शंकर पवार, अजित शंकर पवार, बाबू शंकर पवार, रोहन गंगाराम पवार, अरुण मारुती पवार, वसंत निंबाळकर रा. सोमवार पेठ, मनोज गणेश इंगळे रा. मंगळवार पेठ, शिवाजी बंडू मदने, रा. उमाजी नाईक चौक, विजय नरसिंह पवार, अरुण नरसिंह पवार, मिथुन साहेब जाधव, मंगेश नरसिंह पवार, संजय महादेव गायकवाड रा. सोमवार पेठ, श्याम सुभाष अहिवळे रा. मंगळवार पेठ,या संशयितांचा समावेश आहे.
तडीपार केलेल्या संशयितांना दि.15 ते 19 सप्टेंबर या कालावधीत फलटण नगरपरिषद हद्दीत व कोणत्याही धार्मिक मिरवणुकीत अथवा कार्यक्रमात उपस्थित राहू नये, तसेच त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत बरड येथे दूर क्षेत्रात दररोज हजेरी करता उपस्थित राहण्याचे आदेश बजावले असल्याची माहिती फलटण शहर पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली आहे .