पाटण दि. 16 ( प्रतिनिधी ) पाटण तालुक्यात कोरोना अहवालात शुक्रवारी 14 पाॅझिटीव्ह व दोघांचा मृत्यू तर शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 15 व्यक्ती पाॅझिटीव्ह आल्या. आत्तापर्यंत एकूण 450 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली त्यापैकी तब्बल 276 व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून यात 24 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या 150 बाधीतांवर विविध रूग्नालयात उपचार सुरू असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली.
तालुक्यातील ढेबेवाडी येथील व्यक्तीचा सातारा सिव्हिल तर काळगाव येथील व्यक्तीचा कराड येथील खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांचेवर स्थानिक नगरपालीकेकडून कोवीड निकषांनूसार अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालात आणखी 14 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली तर दोघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात माजगाव येथील 25 व 50 वर्षे पुरुष, पाटण येथील 42, 16, 45, 47 वर्षे महिला, 46, 19, 38 वर्षे पुरूष, मल्हारपेठ येथील 45 वर्षे पुरुष, 34 वर्षे महिला, कडवे बुद्रुक 30 वर्षे पुरूष, पापर्डे 42 वर्षे पुरूष, वजरोशी 32 वर्षे पुरूष यांचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्या संपर्कातील कुटुंबीय, नातेवाईक आदी हाय रिस्कमधील व्यक्तींना इन्स्टीट्युशल क्वारंटाइन करण्यात आले आहे. यात मल्हारपेठ पोलीस दुरक्षेत्रातील एक महिला व एका पुरुष कर्मचारयाचा समावेश आहे.
@ पाटण शहरात आणखी 7 व्यक्तींना कोरोना.
पाटण शहरात कोरोनाचा कहर सुरूच असून आत्तापर्यंत 66 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली त्यापैकी नऊ व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून यात चौघांचा मृत्यू झाला आहे. सध्या 53 व्यक्तींवर विविध रूग्नालयात उपचार सुरू आहेत.