
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,मंगळवारी रात्री २ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मारुतीच्या मंदिरामागील विद्युत खांबावरील लाईट बंद करून,अंधाराचा फायदा घेत आडबाजूला असलेल्या किराणा माल दुकानाच्या शटरची दोन्ही कडील कुलपं दगडाने ठेचून काढून,शटर उघडून दुकानात प्रवेश करून गल्ल्यात असणारे सात हजार रुपये,२० लिटर डिझेल आणि २५ लिटर पेट्रोलसह कोल्ड्रिंक्स आणि लहान मुलांच्या कॅडबरी चाॅकलेटच्या बाॅक्सवर डल्ला मारुन पलायन केले.सदर घटनेची तक्रार म्हसवड पोलीसात दिली असल्याचे दुकानमालक धनाजी काळेल यांनी सांगितले.
चौकट : मुद्देमाल सापडला मात्र रोकड लंपास..
मंगळवारी रात्री आमच्या साहिल किराणा स्टोअर्स मध्ये झालेल्या चोरीतील पेट्रोल,डिझेल,कोल्ड्रिंक्स,कॅडबरी चॉकलेट इत्यादी मुद्देमाल एका पडक्या इमारतीच्या खिंडारात मातीच्या ढिगार्याखाली लपवून ठेवलेला सापडला आहे.मात्र सात हजार रू.चोरून नेणारा चोर अद्याप सापडला नाही.




















