भिवडी ( ता. पुरंदर ) येथील रहिवासी, शेतकरी तसेच हडपसर व महम्मदवाडी येथील यशस्वी हॉटेल व्यावसायिक शामराव अनंतराव वांढेकर (वय ६७) यांचे हडपसर (पुणे) येथे राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले.
कोटक महेंद्र बँकेचे अधिकारी सर्वेश वांढेकर यांचे ते वडील होत. तर सासवडचे माजी नगराध्यक्ष मोहन वांढेकर व सासवड येथील चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. बाळासाहेब वांढेकर यांचे ते कनिष्ट बंधू होत.