प्रतिनिधी फलटण
साखरवाडीचे सुपुत्र सध्या शिरवळ येथील गोदरेज लॉकीम कंपनी मध्ये सेवारत असणारे श्री विठ्ठल तांबे यांना गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला आहे. विठ्ठल तांबे हे सर्वसामान्य कुटुंबातील असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागावा यासाठी शिरवळ येथे नोकरीच्या शोधात गेले व चोवीस वर्ष झाली.त्यांना समाजसेवेची आवड असून नेहमीच सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होत असतात.
सातारा जिल्हातिल सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि कामगार क्षेत्र यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे श्री.विठ्ठल तांबे यांना महाराष्ट्र राज्यचे कामगार राज्यमंत्री श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
श्री तांबे यांनी कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना आणि कामगार शिक्षण या क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार सोहळा 19 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता, हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन ,सेनापती बापट मार्ग ,प्रभादेवी स्टेशन जवळ येथे आयोजित करण्यात आला होता.
.विठ्ठल तांबे यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाले समजताच सातारा जिल्ह्यातील आमदार मकरंद पाटील , आमदार शशिकांतशिंदे ,जि.प.अध्यक्ष उदयदादा कबुले, जेष्ठ उद्योजक दत्तात्रय ढमाळ , सभापती राजेंद्र अण्णा तांबे ,गोदरेज कंपनीचे श्री. अभय पेंडसे (प्लॅन्ट हेड,)श्री. अशोक जाधव (पेर्सोनेल हेड,) एच आर टीम आणि लॉकीम कामगार संघटनेचे पदाधिकारी , गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा, यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या व कौतुकास्पद कामगिरी बाबत अभिनंदन केले.
गोदरेज अँड बॉईस लॉकीम परिवारा तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.