महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :वाठार स्टेशन
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मास-मदिरा ‘पुनःश्च हरी ओम’ च्या नावाखाली सर्व काही चालू केले. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ‘हरी’ला मात्र बंदिस्त ठेवले आहे. केंद्र सरकारने मंदिरे उघडण्याचे निर्देश दिल्यानंतर, राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंदिरे उघडण्याची मागणी करण्यात आली. मात्र, राज्य सरकारने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले.

मंदीरे सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपातर्फे आध्यात्मिक समन्वयक आघाडीतर्फे राज्यभरात आंदोलन करण्यात आले. आज वाठार स्टेशनमधील हनुमान मंदीरासमोर भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष मनोज कलापट यांच्या उपस्थितीत घंटानाद आंदोलन करण्यात आले.
ठाकरे सरकारला इशारा देण्यासाठी आज सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी घंटानाद करण्यात येत आहे. गावागावातील मंदीरे उघडे करा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा यांच्यातर्फे वाठार स्टेशन येथील हनुमान मंदिर येथे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कलापट, संजय गायकवाड, नवल जाधव, यशवंत पवार, राजेश काळोखे, सचिन जाधव, हणमंत मांडवे, मंगेश शितोळे, धर्मेंद्र निंबाळकर, अभिजित जाधव, ज्ञानेश्वर लोंढे, जितेंद्र रावल, ज्ञानेश्वर चव्हाण दत्ता भंडलकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





















