महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी. :
येत्या खरीप हंगामाच्या तोंडावर स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड पुणे या शाखेने वाकेश्वर (ता. खटाव जि.सातारा) येथील कांदा उत्पादक शेतकर्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी महाधन क्रॉपटेक या कांदा पिकासाठी नवीन टेक्नॉलॉजी असलेल्या क्रॉपटेक खताचे प्रात्यक्षिक कांदा उत्पादक शेतकर्यांना दाखवण्यात आले.शेतकर्यांना अद्ययावत माहिती मिळावी तसेच त्यांना तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे प्रात्यक्षिक होते. यावेळी एसटीएल च्या तज्ञांनी शेतकर्यांना पिकांची उत्तम वाढ होण्यासाठी व उत्पादन वाढण्यासाठी महाधन क्रॉपटेक कसे उपयुक्त आहे व त्याच्या वापरासंबंधीही मौलिक मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या वाकेश्वर-वडूज परिसरातील जवळजवळ 100 शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे सातारा जिल्हा वरिष्ठ विक्री व्यवस्थापक मनोहर मोहिते यावेळी बोलताना म्हणाले की,महाधन क्रॉपटेक हे महाराष्ट्रात व कर्नाटकातील कांदा उत्पादक शेतकर्यांच्या पसंतीस उतरले आहे. हे खत विशेषतः कांद्याच्या पिकास लागणार्या प्राथमिक, दुय्यम व सुक्ष्म पोषण मुल्यांना लक्षात घेऊन बनवले आहे. एकीकडे खतांच्या खर्चात 15-20टक्के कपात तर दुसरीकडे उत्पादनात 10-15 टक्के वाढ असा दुहेरी फायदा होत आहे. तसेच 85 ते 90 टक्के कांदे ए व बी ग्रेडचे तयार होतात. हा कांदा 5 ते 6 महिन्यापर्यंत कांदा चाळीमध्ये चांगला टिकतो.विक्रेते गिरीश शहा म्हणाले, वाकेश्वर परिसरात पारंपारिक खताचा वापर करून दोन हजार एकरवर कांदा शेती केली जाते. परंतु गेल्या वर्षी रब्बी हंगामामध्ये महाधन क्रॉपटेक हे खत कांदा शेतीसाठी लॉन्च केले. सुरुवातीला काही शेतकर्यांना हे खत ट्रायल स्वरूपात दिले गेले. आणि त्याचा शेतकर्यांना खूप लाभ झाला. आज 800 ते 900 एकर कांदा शेतीवर शेतकर्यांनी हे खत वापरले आहे. या खताच्या वापरामुळे शेतकरी समाधानी आहे.तसेच कांद्याला रोगराईचे प्रमाण फार कमी आहे. अशा प्रकारचे खत भारतात पहिल्यांदाच आल्यामुळे शेतकरी खुश आहे. तसेच शेतकर्यांच्या खर्चातही 20 ते 25 टक्के बचत झाली आहे.या खताच्या प्रात्यक्षिकाच्या वेळी महाधन क्रॉपटेकचे वापरकर्ते व शेतकरी किरण फडतरे यांनी गौरवोद्गार काढले, ते म्हणाले गेली कित्येक वर्षे मी माझ्या कांदा पिकावर विविध खते वापरुन पाहिली. त्यांनी उत्पादन तर वाढलेच नाही. उलट ते सर्व फार खर्चिकही होते. पण जेव्हापासून महाधन क्रॉपटेक वापरले, तेव्हापासून परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे.
पिकाची उंची, पानांची संख्या व कांद्याचा आकार या सर्वातच वाढ दिसून आली. यावर्षी एक एकर कांदा पिकामध्ये दोन गट पाडले. एका गटात महाधन क्रॉपटेक आणि दुसर्या गटात पारंपारिक खताचा वापर केला. महाधन क्रॉपटेक खताच्या वापरामुळे कांद्याची साईज एक समान व मोठी आली आहे. तर दुसर्या खताच्या वापरामुळे कांद्याची साईज कमी आहे. पारंपारिक खताच्या वापरामुळे दरवर्षी 250ते 300 थैली कांद्याचे निघत होती. आता 270 ते 320 थैली मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी कंपनीचे मार्केटींग मॅनेंजर सिध्देश कदम, मार्केटींग ऑफीसर शिवाजी बागल, अभिजीत काळे, एमडीओ शुभम कांबळे, रिटेलर दुकानदार गणेश घाडगे यांच्यासह अमित फडतरे, विजय फडतरे, आनंदा फडतरे, अनिल घाडगे, श्रीकांत वाघ, संजय फडतरे आदी शेतकरी उपस्थित होते.