कोविड-19 या कालावधीत आपल्या अनेक शिक्षक बांधवांनी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्याची निर्मिती केलेली आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सातारा व LFE पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्य निर्मिती करणाऱ्या शिक्षकांची माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू आहे .या शिक्षकांचा एकत्रित प्लॅटफाॅर्म तयार करुन त्यांना तंत्रयुक्त व नावीन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य निर्मिती बाबत मार्गदर्शन व त्यांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य सर्वापर्यंत पोचवणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तरी आपल्या अधनीस्त सर्व उपक्रमशील शिक्षकांना खालील लिंक पाठवून लिंक मध्ये माहिती भरण्यास प्रोत्साहित करावे. असे आवाहन प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सातारा यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख,प्राचार्य, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांना एका पत्रा द्वारे केले आहे.