जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन
पिंपोडे बु।। : राज्यस्तरीय कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना व विद्यानंद अॅग्रो बारामती यांच्या संयुक्त विद्यामानाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खुल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्र व कार्य यांवर आधारित विषयांवर ही स्पर्धा असून जास्तीत-जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना सातारा टीम यांच्या वतीने मिथिलेश लाड, नेहा गोडसे, सुमित मांढरे यांनी केले आहे.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये तज्ज्ञ परिक्षकांकडून प्रत्येक व्हिडीओचे परिक्षण होणार आहे. स्पर्धा ही खुली असून सर्व वयोगटातील स्पर्धक यामध्ये सहभागी होऊ शकतात. स्पर्धा ऑनलाईन यूट्यूबवर घेतल्या जातील. स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय अंतीम राहील. व्हिडिओ पाठवताना स्पर्धकाचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता पाठवावा, इच्छुक स्पर्धकांनी १५ फेब्रुवारीपर्यंत व्हिडिओ पाठवावेत. तसेच, अधिक माहितीसाठी सुमित मांढरे ७३८७३८००६३, मिथिलेश लाड 9834923321 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सुमित मांढरे यांनी केले आहे.