बारामती प्रतिनिधी
मुरूम ता बारामती तालुक्यातील मुरूम येथील येथे बुणगेवस्तीत गजानन गुरप्पा गायकवाड यांचे सोमवार रात्री १ वाजण्याच्या चोरट्यांचा घर फोडले असल्याचा प्रकार उघडकीसआला असून साधारण ८० हजारांची रोख रक्कम व वस्तू चोरट्यांनी पाळवल्या आहे मिळालेल्या माहितीनुसार गजानन गायकवाड मुरूम( ता बारामती) बुणगेवस्ती येथे यांचे घर असुन सोमवारी रात्री एक च्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या बाजूला असणाऱ्या स्वयंपाक घराचा दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश केला, यावेळी घरातील सर्व झोपेत असताना चोरट्याने कपाटातील रोख रक्कम ४० हजार, पॅन्टच्या खिशातील ५ हजार, १८ हजार आणि १३ हजार किंमतीचे दोन अँड्रॉइड मोबाईल व त्यांचा मुलगा मार्केटिंग चे काम करत असल्याने त्या कंपनीची ५ हजार रुपये किंमतीची औषधे असा ८० हजाराचा रोख रक्कम व वस्तू चोरट्यानी चोरी केली असून पुढील तपास करंजेपुल पोलीस ठाण्याचे हवालदार महेंद्र फणसे करत आहे.





















