लोणंद शहर भाजपाच्या वतीने महाराष्ट्रातील मंदीरे खुली करण्यासाठी कै. कृष्णराव शेळके-पाटील सांस्कृतिक भवन, लोणंद मधील तुळजाभवानीमाता मंदीरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी तिघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. या तीनचाकी अयशस्वी सरकारला देवाने सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करून उद्धवाच्या गजब चाललेल्या सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी तुळजाभवानीमाता चरणी पत्रक ठेवण्यात आले.
यावेळी युवा नेते हर्षवर्धन शेळके-पाटील, प्रदीप क्षीरसागर (जिल्हा कार्यकारीणी सदस्य भाजपा), राहुल नागर (संचालक,बाजारसमिती लोणंद), एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी, सौ. दिपीका घोडके (जिल्हा कार्यकारीणी सदस्य भाजपा), तालुका समन्वय समिती सदस्य सौ. रत्नप्रभा माळी , युवती महिला मोर्चा लोणंद शहर अध्यक्ष दर्शना रावळ, युवती महिला मोर्चा लोणंद उपाध्यक्ष चारुशीला शेंडे, वाई-खंडाळा-महाबळेश्वर क्षेत्र प्रमुख तेजश्री पवार, सीमा धामणकर, मित्तल शेठ शहा, मिलिंद क्षीरसागर, केदार जगदाळे, रुद्र रावळ, राजेंद्र गुरव, मनोज गुरव हे उपस्थित होते.