दहिवडी : ता.१९
मार्डी येथून जवळ असणाऱ्या म्हसवड-शिखर शिंगणापूर रोडवर असणाऱ्या रांजणी पाटी येथील बस थांबा असणाऱ्या शेडचा पत्रा चोरीला गेल्याप्रकरणी रोहित पोळ यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या सातारा विभाग नियंत्रकांकडे तक्रार अर्जाद्वारे तक्रार केली आहे.
त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मौजे रांजणी पाटी (म्हसवड-शिखर शिंगणापूर रोड)येथील एसटी थांबा असणाऱ्या शेडवरील पत्रा चोरीला गेला असून याबाबत चौकशी करून संबंधिताविरोधात गुन्हा नोंद करावा. मार्डी येथील बस थांबा बेकायदेशीररित्या बंद ठेवल्याने व आगाराच्या पूर्वपरवानगीशिवाय बदल केल्याने संबंधित व्यक्तिवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रोहित पोळ यांनी परिवहनच्या विभाग नियंत्रकांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.