महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले(कळंब – इंदापूर)
पुणे जिल्हात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या रोगाच्या संसर्गाची साखळी तोडून रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव व महसूल विभागाचे उपआयुक्त प्रताप जाधव यांनी नव्याने ९ अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. यामुळे आता प्रशासन आता १८ अधिकारी यांच्या अधिपत्याखाली कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यापूर्वी जिल्ह्यामध्ये ९ अधिकारी यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात होते. यामध्ये प्रांताधिकारी यांचा समावेश होता. मात्र एका अधिकारी यांस एकापेक्षा जास्त तालुक्याचा अधिभार असल्याने विभागीय आयुक्तांनी तातडीने आणखी ९ अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.
नियुक्त अधिकारी यांची नावे व कार्यक्षेत्र
हिंमत खराडे – इंदापूर
दादासाहेब कांबळे – बारामती
प्रमोद गायकवाड – पुरंदर
भानुदास गायकवाड – दौंड
राजेंद्रकुमार जाधव – भोर
श्रीमंत पाटोळे – वेल्हा
संदेश शिर्के – मावळ
सुनील गाडे – मुळशी
संतोषकुमार देशमुख – शिरूर
संजय तेली – खेड
अजय पवार – जुन्नर
सारंग कोडोलकर – आंबेगाव
सचिन बारवकर – हवेली
सुनील कोळी – हवेली तालुक्यातील थेऊर व उरळीकांचन मंडल
आप्पासाहेब समिंदर – हवेली तालुक्यातील वाघोली व कळस मंडल
निलप्रसाद चव्हाण – हवेली तालुक्यातील खेड शिवापूर व हडपसर मंडल
बालाजी सोमवंशी – हवेली तालुक्यातील कोथरूड व खडकवासला मंडल