कळंब प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
लासुर्णे येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेला कोरोनाची लागण झाली आहे . इंदापूर शहरातील महतीनगर येथील ७२ वर्षीय कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर आज भिगवण स्टेशन येथील ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे .
इंदापूर तालुक्यातील आजचा पाचवा बळी आहे.
गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत, आता पुन्हा लासुर्णे, भिगवण स्टेशन याठिकाणी रूग्ण आढळून येत आहेत . यामुळे तालुक्यात कोरोना विळख्याचा जोर वाढू लागला आहे.
काल रात्री इंदापूरच्या महतीनगरमधील ७२ वर्षीय व्यवसायिकाचा पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मृत्यू झाला होता. हि घटना ताजी असतानाच आज भिगवण स्टेशन येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या मृत्यूमुळे इंदापूर हादरले आहे.
दरम्यान लासुर्णे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला. या परिचारिकेच्या संपर्कात नेमके कोण व कितीजण आले आहेत याची चाचपणी आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे . दवाखान्यापर्यंत कोरोना पोहचल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे .