राधेकृष्ण मंगल कार्यालयात पार पडली व्यापाऱ्यांची बैठक.
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी(वाठार स्टेशन) : मुकुंदराज काकडे
संपूर्ण जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वाठार स्टेशन मध्ये व्यापारी संघटनेमार्फत सहा दिवसांचा बंद पाळण्यात येणार आहे यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता हा बंद पुकारण्यात आला आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज वाठार स्टेशन येथील राधेकृष्ण मंगल कार्यालयात व्यापाऱ्यांची बैठक पार पडली यामध्ये सर्वानुमते हा बंद पुकारण्यात आला त्याचप्रमाणे वाठार स्टेशन स.पो.नि स्वप्नील घोंगडे यांना अशा आशयाचे निवेदनही देण्यात आले यामध्ये ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आला आहे तोच एरिया प्रतिबंधित करण्यात यावा असाही मुद्दा निवेदनात मांडण्यात आला. वाठार स्टेशनमध्ये कोरोना या रोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालल्याने हा सावध पवित्रा व्यापारी संघटनेकडून घेण्यात आला आहे.