महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी(कळंब – इंदापूर) : शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यात कोरोनामुळे परिस्थिती भयंकर होत चालली आहे. समुदाय प्रसारच्या माध्यमांतून अनेकजण कोरोना बाधित होत आहेत. या कोरोना बाधित रूग्णांना किंवा संशयित रूग्णांवर उपचार करताना डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता कार्य करीत आहेत .
डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लागणारे साहित्य पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या जिल्हा परिषदेच्या कोव्हिड कॅश कार्ड अंतर्गत ३ लाख रुपये रकमेचे पी.पी.ई.किट , मास्क , ऑक्सिमीटर , इन्फ्रारेड , थर्मामीटर व इतर साहित्याचे वाटप इंदापूर तालुक्यातील बावडा आरोग्य केंद्र व सर्व उपकेंद्रातील डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी यांना करण्यात आले .
यावेळी बावडा ग्रामपंचायतीचे सरपंच किरण पाटील , बावडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. कपीलकुमार वाघमारे, डाॅ. स्नेहल पवार, डाॅ. पानबुडे, डाॅ. निकिता घोगरे, डाॅ. वैशाली खाडे, डाॅ. सुमिती ढोले आदी मान्यवर , आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते .