ग्रामपंचायत, सातारा तालुका पोलीस ठाण्यातून कारवाई करण्यास कुचराई : चंद्रकांत जाधव
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी(सातारा)
करंडी, ता. सातारा येथील कमलाकर जाधव यांनी उपसरपंच सोमनाथ जाधव, ठेकेदार संदीप जाधव यांच्या मदतीने करंडी ग्रामपंचायत व सातारा तालुका पोलिसांना मैनेज करून बेकायदेशीर जागेची नोंद करून घराचे बांधकाम सुरू केले आहे. हे काम थांबवण्यासाठी गेलेल्या चंद्रकांत जाधव यांच्या कुटुंबाला मारहाण करुण्यात आली. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ग्रामपंचायत, पोलिसांच्या संगनमताने अनधिकृत बांधकाम करण्यास प्रोत्साहन देत असून केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास कुचराई करण्यात येत आहे, असा आरोप करंडी येथील रहिवाशी चंद्रकांत बुवासाहेब जाधव यांनी केला आहे.
चंद्रकांत बुवासाहेब जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, चंद्रकांत जाधव यांचा सातारा तालुक्यातील करंडी येथे वडिलोपार्जीत वाडा आहे. या वाड्यात भावकीतील इतर जण हिस्सेदार आहेत. या वाड्यासमोर मोकळी जागा आहे. ती जागा कमलाकर जाधव यांनी ग्रामपंचायतीमध्ये १९९६-९७ मध्ये कोणत्याही ठरावाशिवाय नोंद केली. त्या जागेवर त्यांनी सध्या इतर जण हिस्सेदारांची संमती आणि शासनाची कोणतीही परवानगी न घेता घर बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. हे बेकायदेशीर बांधकाम करण्यास उपसरपंच सोमनाथ जाधव मदत करीत असून काम उपसरपंचाचे बंधू ठेकेदार संदीप जाधव करीत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत यांच्याकडे निवेदन देऊन काम थांबविण्याची मागणी केली होती. या वर ग्रामपंचायतिने नोटीस काढले मात्र त्याला केराची टोपली दाखून काम सुरूच ठेवले आहे. याबाबत काम सुरु असताना ग्रामपंचायत बांधकामाबाबत कोणतीही कारवाई करीत नाही.
या कामाबाबत चंद्रकांत बुवासाहेब जाधव यांच्या कुटुंबीयांनी हरकत घेतली असता त्यांना कमलाकर जाधव, विकी जाधव, गणेश जाधव, पांडुरंग जाधव यांनी लाथाबुक्या व दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी संगनमत करून साधी चौकशीहि करण्याचे तसदी घेतली नाही. कमलाकर जाधव यांच्या घरामुळे चंद्रकांत बुवासाहेब जाधव यांना आपल्या घरात जाण्यास अडथला निर्माण झाला आहे. तसेच घरातील सांडपाणी जाण्याचा मार्गही बंद केला आहे.चंद्रकांत जाधव यांच्यावर होत असलेल्या अन्याय दूर व्हावा यासाठी कमलाकर जाधव यांच्या बेकादेशीर बांधकाम थांबवून, या कामाला पाठीशी घालणाऱ्या सरपंच व पोलिसांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा संपूर्ण कुटुंबासह ग्रामपंचायत समोर उपोषण केले जाणार आहे