महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:(लोणी भापकर)
पळशी येथील गावाच्या हद्दीत असणारी कोळेकर वस्ती चा गावांशी संपर्क तुटला असून, वस्ती ते गाव असा जोडणारा ओढ्याचा बंधारा जोरदार पाऊस झाल्याने वाहून गेला आहे.त्यामुळे तेथील लोकांना गावांमध्ये येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे .
त्याचप्रमाणे पाऊस जोरात झाल्याने तेथील काही घरांची पडझड झाली आहे ग्रामपंचायत च्या वतीने वस्ती वरती जाऊन पंचनामे करण्यात आले आहेत यावेळी ग्रामसेविका दीपाली हिरवे व उपसरपंच संदीप कोळेकर उपस्थित होते.