
यावेळी राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रूपालीताई चाकणकर,पालकमंत्री बाळासाहेब पाटील, युवक अध्यक्ष महेबुब शेख,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने,राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख,अभयसिंह जगताप,मनोज पोळ, तालुकाध्यक्ष विक्रम शिंगाडे, दहिवडी,वडूज या शहरातील नगरसेवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ना. जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एक एक कार्यकर्ता जोडला जात असून आज आपला पक्ष तळागाळात उभा होत आहे. आज पक्षाकडे तरुणांची मोठी फळी निर्माण झाल्यामुळे उद्याचा महाराष्ट्र हा राष्ट्रवादीमय असणार असा विश्वास ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील बोलताना म्हणाले की सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये राष्ट्रवादी वाढवण्यासाठी युवकांनी संघटन करणे महत्त्वाचे आहे.सातारा जिल्हा हा नेहमीच पवार साहेबांसोबत संकटाच्या काळात सुद्धा राहिलेला जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सरकारच्या माध्यमातून लाखो रुपयाची विकास कामे कामे काळात होणार आहेत. माण खटाव मध्ये राष्ट्रवादी काम चांगल्या प्रकारे सुरू आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख बोलताना म्हणाले की माण व खटाव मध्ये राष्ट्रवादीची ताकत वाढत आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती मोठ्या ताकतीने राष्ट्रवादी पार्टी लढवणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे ग्रामीण भागातील विकासासाठी मोठा निधी देत आहे. माण तालुक्यातील उत्तर भागातील पाणी प्रश्नासाठी लवकरच शासन दरबारी पाठपुरावा करुन येथील प्रश्न कायम स्वरूपी सुटण्यासाठी प्रयत्न करणार आहे.






















