संभाजीनगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये विविध विकास कामासाठी जागे अभावी अडचणी निर्माण होत असले कारणाने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पत्रव्यवहार करून बाजार समितीच्या जागेवर विकास आराखडा मंजूर करणेबाबत विशेष ग्रामसभेचे मागणी केली होती त्याप्रमाणे आज विशेष ग्रामसभा बोलावून सरपंच सतीश माने यांच्या अध्यक्षतेखाली सदर ग्रामसभा संपन्न झाली सभेच्या सुरुवातीस सरपंच सतीश माने यांनी सभेपुढील विषयाविषयी स्पष्टीकरण देऊन या विषयावर ग्रामस्थांनी चर्चा करण्यासंदर्भात आवाहन केले व ग्रामविकास अधिकारी मोहन कोळी यांनी विषयाचे वाचन करतातच नागरिकांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटून सर्वप्रथम एडवोकेट संदेश कुंजीर यांनी आक्रमकपणे बाजार समिती सभापतींनी पाठवलेल्या हरकतीचा खरपूस समाचार घेत संभाजीनगर ग्रामस्थांच्या भावनांची कदर करत त्यांना संभाजीनगर ग्रामस्थ भीक घालत नसून त्याला कायदेशीरपणे सडेतोड उत्तर देण्यास संभाजीनगर ग्रामस्थ समर्थ आहेत व यासाठी वकील म्हणून संभाजीनगर मधील आम्ही सर्व वकील बंधू मोफत लढाई लढू व संभाजीनगर ग्रामस्थांच्या स्वप्नातील विकास आराखडा पूर्ण करून अशा पद्धतीची भावनिक साद देत ग्रामस्थांना आव्हान केले यानंतर लगेच एडवोकेट सागर जाधव यांनी ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था असून ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय ग्रामपंचायत हद्दीतील महसुली खुल्या जागेत कोणतेही आरक्षण टाकताना सर्वप्रथम ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांना विश्वासात घेणे बंधनकारक असताना याबाबत कोणीही ग्रामसभेला आव्हान देऊ शकत नाही व महसुली कायद्यानुसार यासाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही समर्थ असल्याबाबत कायदेशीर मांडणी केली यानंतर प्रशांत नलवडे यांनी बाजार समिती सभापतींच्या जनावराच्या बाजारा समधीच्या प्रश्नास उत्तर देताना शेतकऱ्यांचा एवढाच जर कळवळा असेल तर जनावरांचा बाजार मांडव्यात भरवावा असा खोचकटोला दिला यावेळी संभाजी नगरच्या विकासासाठी विशेषतः पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीच्या प्रश्नासंदर्भात तसेच ग्रामीण रुग्णालय ,स्वर्गीय नंदा जाधव यांचा वारसा सांगणाऱ्या संभाजीनगर मध्ये भव्य असे क्रीडांगण ,जिमखाना व वॉकिंग ट्रॅक तसेच शाळा इमारत ,सुसज्ज असेगार्डन अशा विविध प्रकल्पांसाठी जागेची कमतरता भासत असून यासाठी कसल्याही परिस्थितीत बाजार समितीच्या जागेवरती विकास आराखड्या नुसार संपूर्ण क्षेत्रावर शासनाने आरक्षण घोषित करण्यासंदर्भात उत्स्फूर्तपणे चर्चा होऊन ग्रामस्थांनी एकमुखाने ठराव संमत केला .
सदर ठरावास शफी इनामदार यांनी अनुमोदन दिले सदर चर्चेमध्ये अर्चना देशमुख उपसरपंच काशिनाथ गोरड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पोळमामा पंकज मिसाळ ,अमोल तांगडे ,अजित कणसे ,देवेंद्र देशमुख आप्पा राजे, अनिल खराडे ,जहांगीर इनामदार ,अनिकेत निकम ,सुनील फडतरे व इतर ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.
या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे एकाही ग्रामस्थांनी सदर विषयास विरोध न करता आजपर्यंतच्या संभाजीनगर मधील झालेल्या ग्रामसभे पैकी सर्वाधिक उपस्थिती दाखवून ग्रामस्थांनी गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून संभाजीनगरचा सर्वांगीण विकासासाठी एक मुखाने निर्णय घेतला .
या सभेस सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.