महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : (वाई)
विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी यांच्या माध्यमातून वाई तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये अतुलनीय काम केलेल्या योद्धांचा सन्मानपत्र, पुष्प व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
सन्मान मूर्ती ह्या वाई तालुक्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करीत होत्या, त्यामध्ये डॉक्टर,पोलीस प्रशासन, पोलीस पाटील, आशा वर्कर, सरपंच, तसेच अंगणवाडी सेविका अशा एकूण 35 कोरोना योद्धांचा सन्मान विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी यांच्या माध्यमातून घेण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मा.शशिकांत कोचळे, सचिव रामदास कोचळे, उपाध्यक्ष समीर मेंगळे,वाई तालुका युवक अध्यक्ष सूचित पिसाळ,पै.नितीन वरखडे( तात्या) तसेच महाराष्ट्र न्यूज पत्रकार ओंकार पोतदार इतर पदाधिकारी उपस्थित होते.