महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : फलटण
साखरवाडी जनरल मर्चंट असोसिएशन साखरवाडी यांच्याकडून जनता कर्फ्यू प्रयोग दिनांक २१ नऊ ते २७ नोव या कालावधीत बंद पाळण्याचा निर्णय झाला आहे साखरवाडी गावांमध्ये कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेता २१.९.२०२० ते २७.९.२०२० संपूर्ण बाजारपेठ सर्व मेडिकल दुकाने वगळून बंद ठेवण्याचा सर्व व्यापारी वर्ग ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत समस्त नागरिक यांच्या वतीने निर्णय एकमताने घेण्यात आला आहे हा जनता कर्फ्यू असल्याने यावर कोणतेही शासकीय बंधन नाही तरी या कालावधीत कडक जनता कर्फ्यू साखरवाडी करांनी पाळून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी अध्यक्ष व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष. उमाकांत भोसले, उपाध्यक्ष, विनोद जाधव, महेश भोसले, सचिव, दिलीप कुमार भगत, खजिनदार, युवराज रणवरे, उमेश बावकर, व ग्रामस्थ उपस्थित होते.